Sanjay Bansode Udgir Vidhan Sabha constituency: संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान
उमेदवाराचं नाव - संजय बनसोडे
मतदारसंघ - उदगीर
उमेदवाराची माहिती - (विभाग) - लातूर
पक्षाचं नाव - राष्ट्रवादी (अजित पवार गट)
उमेदवाराची कितवी लढत - दुसरी
समोर कोणाचं आव्हान - (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट) सुधाकर भालेराव
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- राष्ट्रवादी पक्षाची पहिली उमेदवारी मिळताच निवडून आले. लगेच कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मतदार संघात केलेलं विकास कामे. लोक नेते अशी मतदार संघात ओळख.
संजय बनसोडे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उदगीर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
उदगीर विधानसभा मतदारसंघात यावेळी दुरंगी लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय बनसोडे यांनी भाजपच्या अनिल सदाशिव कांबळे यांचा परभाव केला होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असलेले आमदार बनसोडे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिले आहेत. कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अशी त्यांची पक्षसंघटनेतील वाटचाल राहिली आहे. 2014 मध्ये उदगीर राखीव मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उदगीरमध्ये जनसंपर्क वाढवला. परंतु, पहिल्या प्रयत्नात त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये मात्र बनसोडे निवडून आले. ज्या मतदारसंघात भाजपाची पकड मजबूत होती, तिथे केवळ व्यक्तिगत संपर्क आणि पक्षाच्या पाठबळावर बनसोडे निवडून आले होते. आमदार म्हणून निवडून येणे हेच मोठे यश मानलेल्या बनसोडे यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनपेक्षितपणे राज्यमंत्रिपद मिळाले. विशेष म्हणजे रविवारी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा त्यांची अचानकपणे कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत गेले होते.