Rajesh Patil Kolhapur Assembly constituency: कोल्हापुरात काका पुतण्याचे उमेदवार आमने-सामने, राजेश पाटील विरुद्ध नंदाताई बाबुळकर यांच्यात लढत
उमेदवाराचं नाव- राजेश पाटील
पक्षाचं नाव- अजित पवारांची राष्ट्रवादी
मतदारसंघ- चंदगड विधानसभा मतदार संघ, कोल्हापूर
समोर कोणाचं आव्हान- राष्ट्रवादी SP चे संभाव्य उमेदवार नंदाताई बाबुळकर , तसेच शिवाजी पाटील आणि मानसिंग खोराटे हे या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहू शकतात.
उमेदवाराची कितवी लढत- २ री लढत त्याचसोबत 2019 मधील आकडेवारी - 54 हजार 851 राजेश पाटील यांना मते पडली.
मतदारसंघातील आव्हानं- या भागात काजू प्रक्रिया संदर्भात प्रकल्प येणे गरजेचे आहे
या भागात प्रचंड रस्ते खराब आहेत त्यामुळे चांगले रस्ते होणे गरजेचे आहे
या भागातील मतदार हे जास्त करून मुंबई आणि गोवा या ठिकाणी असल्यामुळे मतदानासाठी अनान हे मोठा आव्हान आहे.
हा भाग प्रचंड दुर्गम असून या ठिकाणी अशिक्षित लोक जास्त आहेत.
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- उमेदवार हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा एकदा ही निवडणूक लढवत आहे जवळपास पंधराशे कोटी रुपयांची विकास काम केल्याचा दावा त्यांनी या मतदार संघात केला आहे.