Nitesh Rane Kankavli Assembly constituency : नितेश राणेंनी साधली हॅट्रिक; कणकवलीमधून विजयी

Nitesh Rane Kankavli Assembly constituency : नितेश राणेंनी साधली हॅट्रिक; कणकवलीमधून विजयी

नितेश राणे तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला लागले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरवातीचे कल पाहता राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी घेतलेली पाहायला मिळत आहे. 

याच पार्श्वभूमीवर कणकवली मतदारसंघातून नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी लढत पाहायला मिळाली. कणकवली विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या लढतीमध्ये नितेश राणे यांनी बाजी मारली असून नितेश राणे यांचा विजय झाला आहे.

उमेदवाराचे नाव : नितेश नारायण राणे

मतदारसंघ - कणकवली

पक्ष- भाजप

समोर कोणाचं आव्हान : संदेश पारकर

नितेश राणे तिसऱ्यांदा निवडणूक लढवली असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढताना नितेश राणे यांनी शिवसेनेचे सतीश सावंत यांचा 26 हजार मतांनी पराभव केला. यामध्ये नितेश राणे यांना 84हजार 504 मते तर सतीश सावंत यांना 56 हजार 388 मते मिळाली होती.

स्वाभिमान पक्षाच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामाला सुरुवात झाली. 2009 च्या नारायण राणेंच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात नितेश राणेंची एन्ट्री झाली. 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. त्यात भाजपचे उमेदवार प्रमोद जठार यांचा सुमारे 25 हजार मतांनी पराभव केला. यानंतर 2019च्या विधानसभा निवडणूकीत भाजपकडून लढताना नितेश राणे यांनी शिवसेनेचे सतीश सावंत यांचा 26 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर तिसऱ्यांदा नितेश राणे हे निवडणूक लढवत होते भाजपकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

नितेश राणे यांचे प्लस पॉईंट्स म्हटले तर नितेश राणे यांचा दांडगा जनसंपर्क असून मतदारसंघात विकासकामे झाली आहेत. प्रत्येक गावात बूथप्रमुखाशी थेट संपर्क असतो. तसेच रस्ते, ब्रिज, पाणी यावर लक्ष केंद्रित असून मतदारसंघातील देवगड तालुक्यात पर्यटनदृष्ट्या अनेक कामे केली आहेत. आ. नितेश राणेंची कणकवली विधानसभेवर मजबूत पकड आहे.कणकवली, देवगड, वैभववाडी या विधानसभा मतदारसंघातून 2014 ते 2019 या 10वर्षाचा काळात आ. नितेश राणे यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी 3 नगरपंचायत व 169ग्रामपंचायत पैकी एकूण 80टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायत या भाजपच्या ताब्यात असून मतदार संघात आ. नितेश राणेंसाठी लढत सोपी मानली जात आहे. गेल्या 10 वर्षात आ. नितेश राणेंच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील, सहकार क्षेत्र ही जमेची बाजू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com