Mahim Assembly Election Results 2024: माहीम विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीमध्ये महेश सावंत विजयी
माहीम मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी 3683 मतांनी विजय मिळवला आहे. महेश सावंत यांच्या विजयामुळे राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का बसला आहे.
मुंबईतील सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र, अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची आधी ओळख होती. मात्र मनसेचा उमेदवारा, तेही राज ठाकरेंचा पुत्र येथून निवडणूक लढवत असल्याने वेगळंच चित्र पहायाला मिळालं.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात 52.67 टक्के मतदान झाले होते. आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे.
माहीम विधानसभा 15वी फेरी
उबाठा- महेश सावंत- 40828
शिवसेना- सदा सरवणकर- 39649
मनसे- अमित ठाकरे- 27324
अमित ठाकरेंनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पाणी व रहदारीशी संबंधित समस्या सोडविणे, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, छत्रपती शिवाजी महाराज पार्क धूळमुक्त आदी मूलभूत व पायाभूत सुविधा देण्याच्या मुद्द्यांवर भर दिला असून भविष्यात यासंबंधित विविध कामे करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून दिले होते. परंतु, तरीही अमित ठाकरेंची जादू चालली नाही. तर, उद्धव ठाकरे यांचा शिलेदार महेश सावंत विजयी ठरले आहेत. त्यामुळे ते जायंट किलर ठरलेत.