Dnyanraj Chougule Umarga Assembly Election 2024: शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांना प्रवीण वीरभद्रया स्वामी यांचं आव्हान
उमेदवाराचं नाव - ज्ञानराज चौगुले
मतदारसंघ - उमरगा
उमेदवाराची माहिती - (विभाग) - मराठवाडा
पक्षाचं नाव - शिवसेना शिंदे
समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार)- प्रवीण वीरभद्रया स्वामी
उमेदवाराची कितवी लढत - 4
चौगुले यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत ८६ हजार ७७३ एवढी मते घेतली होती, काँग्रेसचे दत्तू भालेराव यांना ६१ हजार १८७ मते मिळाली होती यात ज्ञानराज चौगुले यांनी काँग्रेसचे उमेदवार दिलीप भालेराव यांचा २५ हजार ५८६ मतांनी पराभव केला होता.
मतदारसंघातील आव्हानं
वाढती महागाई , शेतीमालाला नसलेला दर, मराठा आरक्षणाचा फटका बसू शकतो. सलग तीन वेळा आमदार असल्याने अँटी इन्कंबंसी असल्याचे सांगण्यात येते.
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळख.
महायुती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात यश
मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहिल्याने फायदा होण्याची शक्यता
लाडकी बहीण व शासनाने जाहीर केलेल्या योजनांमुळे मोठा फायदा होण्याची शक्यता