Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency : देवेंद्र फडणवीसांसमोर काँग्रेसच्या प्रफुल गुडधेंचे आव्हान

Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency : देवेंद्र फडणवीसांसमोर काँग्रेसच्या प्रफुल गुडधेंचे आव्हान

देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. ओबीसीबहुल मतदारसंघात काँग्रेसचे प्रफुल गुडधे यांचं आव्हान.
Published by :
shweta walge
Published on

उमेदवाराचं नाव- देवेंद्र फडणवीस

पक्षाचं नाव- भारतीय जनता पार्टी

मतदारसंघ- दक्षिण-पश्चिम ( नैऋत्य) नागपूर

समोर कोणाचं आव्हान (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार); काँग्रेसचे सचिव प्रफुल गुडधे

उमेदवाराची कितवी लढत; चौथ्यांदा आमदार आहेत ज्यांनी नागपूर पश्चिममधून दोनदा (1999, 2004) आणि नागपूर दक्षिण पश्चिममधून तीनदा (2009, 2014, 2019) विधानसभा निवडणुका जिंकल्या.

मतदारसंघातील आव्हानं

देवेंद्र फडणवीस विरुद्ध गुडधे पाटील यांच्यात यापूर्वी २०१४ मध्येही लढत झाली होती व त्यात देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली होती. यंदा गुडधे पाटील परिवर्तनाचा नारा देत फडणवीसांच्या विरोधात रिंगणात आहेत. एक अभ्यासू नगरसेवक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख गुडधे यांची या मतदारसंघात आहे. 

● नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शहरातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत नवीन आहे. २००९ मध्ये पश्चिम आणि दक्षिण नागपूरमधील काही भाग मिळून दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

● २००९ मध्ये फडणवीस यांनी कॉँग्रेसचे विकास ठाकरे यांचा २७ हजार मतांनी, २०१४ मध्ये कॉँग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांचा ५८ हजार मतांनी व २०१९ मध्ये कॉँग्रेसचे डॉ.आशीष देशमुख यांचा ४९ हजार मतांनी पराभव केला होता.

● हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी सुरुवातीच्या काळापासून फडणवीस यांचा मतदारसंघाशी संपर्क आहे. तेच धोरण त्यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री असतानाही कायम ठेवले.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात चार लाखांहून अधिक मतदार आहेत. हा मतदारसंघ ओबीसीबहुल म्हणून ओळखला जातो. दलित मतदारांची संख्याही येथे फार मोठी आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचे निर्णय घेतले. त्यामुळे त्यांची ओबीसी मतदांरांवरची पकड अधिक घट्ट झाली.

दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचादेखील ओबीसी मतदार हाच आधार आहे. त्यामुळे दलित, आदिवासी मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बसपातर्फे सुरेंद्र डोंगरे तर वंचिततर्फे विनय भांगे रिंगणात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com