worli matdarsangh
worli matdarsangh

वरळीत आदित्य ठाकरे, मिलिंद देवरा, संदीप देशपांडे यांच्यात लढत

वरळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यात लढत
Published by :
Team Lokshahi
Published on

उमेदवाराचे नाव : आदित्य ठाकरे

मतदारसंघ : वरळी

पक्षाचे नाव - ठाकरे शिवसेना

समोर कोणाचं आव्हान - मिलिंद देवरा, संदीप देशपांडे

आदित्य ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व पक्षाचे आमदार आहेत. त्यांचा जन्म १३ जून १९९० रोजी मुंबईत झाला. ठाकरे यांनी मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून बी.ए. आणि केसी कॉलेजमधून एलएल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आदित्य हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा शिवसेनाप्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.

राजकीय कारकीर्द:

आदित्य ठाकरे यांनी वयाच्या 20 व्या वर्षी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेना पक्षातून केली. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात उडी घेतली होती.

  • सन 2010 पासून ते युवा सेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत

  • 2018 पासून ते शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत

  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवड

  • मुंबईतील वरळी या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व

  • जानेवारी 2020 ते जून 2022 पर्यंत त्यांना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री म्हणून काम

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com