उमेदवार प्रोफाईल
Bala Nandgaonkar: शिवडीतून बाळा नांदगावकर रिंगणात
उमेदवाराचे नाव : बाळा नांदगावकर
मतदारसंघ : शिवडी
पक्षाचे नाव - मनसे
समोर कोणाचं आव्हान - ठाकरे शिवसेना
बाळा नांदगावकर हे महाराष्ट्रातील राजकारणी असून त्यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती.
बाळा नांदगावकर यांची राजकीय कारकीर्द:
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.