राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पहिली यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्वत:च्या नावाची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. जयंत पाटील हे इस्लामपूरमधून निवडणूक लढणार आहेत.
बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर
बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढाई कठीण असणार आहे.
पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे-
1. जयंत पाटील - इस्लामपूर
2. राजेश टोपे- घनसावंगी
3. बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
4. जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळवा
5. शशिकांत शिंदे- कोरेगाव
6. जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
7. गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
8. हर्षवर्धन पाटील- इंदापूर
9. प्राजक्त तनपुरे- राहुरी
10. अनिल देशमुख- काटोल
11. अशोकराव पवार- शिरुर
12. मानसिंगराव नाईक- शिराळा
13. सुनील भुसारा- विक्रमगड
14. रोहित पवार- कर्जत जामखेड
15. विनायकराव पाटील- अहमदपूर
16. राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
17. सुधाकर भालेराव- उदगीर
18. चंद्रकांत दानवे- भोकरदन
19. चरण वाघमारे- तुमसर
20. प्रदीप नाईक- किनवट
21. विजय भांबळे-जिंतूर
22. पृथ्वीराज साठे- केज
23. संदीप नाईक- बेलापूर
24. बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
25. दिलीप खोडपे- जामनेर
26. रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
27. सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
28. रविकांत बोपछे- तिरोडा
29. भाग्यश्री अत्राम- अहेरी
30. बबलू चौधरी- बदनापूर
31. सुभाष पवार- मुरबाड
32. राखी जाधव- घाटकोपर पूर्व
33. देवदत्त निकम- आंबेगाव
34. युगेंद्र पवार - बारामती
35. संदीप वर्पे- कोपरगाव
36. प्रताप ढाकणे- शेवगाव
37. राणी लंके- पारनेर
38. मेहबूब शेख- आष्टी
39. करमाळा-नारायण पाटील
40. महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
41. प्रशांत यादव- चिपळूण
42. समरजीत घाटगे - कागल
43. रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
44. प्रशांत जगताप -हडपसर
45. नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे