Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू

निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सूरज दहाट, अमरावती

निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बैठका, पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा असा बॅनरवर उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

एकीकडे रवी राणा यांच्या उमेदवारीला महायुतीमधून भाजप कडून कडाडून विरोध असताना उमेदवारी जाहीर केल्याने चर्चेला उधाण आलं असून रवी राणा महायुतीचे उमेदवार व चिन्ह जाहीर करून प्रचार सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.

बॅनरवर महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे फोटो छापले असून प्रचाराला अजून वेळ आहे तसेच अद्यापही उमेदवारी जाहीर झाली नाही तरी देखील रवी राणा यांचा प्रचार सुरू झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com