कल्याण मतदारसंघात भाजप vs शिवसेना, शिंदे गटाचे कार्यकर्ते-पदाधिकारी आक्रमक

कल्याण मतदारसंघात भाजप vs शिवसेना, शिंदे गटाचे कार्यकर्ते-पदाधिकारी आक्रमक

महायुतीचे उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह याही ठिकाणी महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. या सर्व वातावरणाचा फायदा सुलभा गायकवाड यांना मिळेल.
Published by :
shweta walge
Published on

भाजपकडून विधानसभेसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते-पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याचा शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात वैयक्तिक वाद असून तो जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ते वेळोवेळी मांडत असतात. याबाबत त्यांचे वरिष्ठ जास्त चांगली प्रतिक्रिया देऊ शकतात.

महायुतीचे उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह याही ठिकाणी महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. या सर्व वातावरणाचा फायदा सुलभा गायकवाड यांना मिळेल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे इच्छुक असतात त्यांचा थोडा भ्रमनिरास होता, नाराजी पसरते. याबाबत महायुतीचे सर्व नेते त्यांची समजूत काढून यातून मार्ग काढतील आणि ही जागा महायुती म्हणून निवडून आणू अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

कल्याण मतदारसंघात भाजप vs शिवसेना, शिंदे गटाचे कार्यकर्ते-पदाधिकारी आक्रमक
Maharashtra Vidhan Sabha Election | भाजपनंतर काँग्रेसची यादी कधी? संभाव्य उमेदवारांची नावं समोर?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com