भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर महायुतीने पत्रकार परिषद देखील घेतली. या पत्रकार परिषदेमधून सरकारच्या कामाचा रिपोर्टकार्ड सादर करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर आज भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता जाहीर होण्याची शक्यता असून 110 उमेदवारांची यादी असल्याची माहिती मिळत आहे.

यादी जाहीर होण्याआधीच उमेदवारांना निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 100पेक्षा अधिक जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

यातच पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेची जागा देखील यात भाजपला मिळणार असल्याचे बोलले जात असून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे पोर्शे प्रकरणात अडचणीत आल्याने तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजपकडून जगदीश मुळीक याना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com