मोठी बातमी! भाजपची विधानसभेसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' असतील उमेदवार

मोठी बातमी! भाजपची विधानसभेसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' असतील उमेदवार

भाजपने विधानसभेसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

विधानसभेच बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

जाहीर केलेल्या यादीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून,मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून,मंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून, श्रीजया अशोक चव्हाण भोकरमधून, आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून, मंगल प्रभात लोढा मलबार हिलमधून निवडणूक लढवणार आहेत. कुलाब्यातून राहुल नार्वेकर, साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जाहीर केले आहे. पुढील यादी खालीलप्रमाणे...

अशोक चव्हाण यांच्या मुलीला तर रावसाहेब दानवेंच्या मुलाला संधी
भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना देखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com