भाजपची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

भाजपची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या यादीत 107 उमेदवारांची नाव जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. काल महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी तब्बल तीन तास बैठक चालली असल्याची माहिती मिळत आहे.

या बैठकीसाठी अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे यांची उपस्थिती होती. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा झाली असून आज यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com