बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार; बच्चू कडू म्हणाले...

बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार; बच्चू कडू म्हणाले...

विधानसभेच बिगुल वाजलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभेच बिगुल वाजलं आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

यातच बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला आहे. यावर प्रतिक्रिया देत बच्चू कडू म्हणाले की, भाजप आपलाच उमेदवार बकरा करायाला लागला अशी एकंदरीत स्थिती आहे. भाजपच्या खांद्यावर पंजा लहरवण्याची एकंदरीत मानसिकता भाजपची माझ्या मतदारसंघात आहे. राणा कुटुंब जिल्ह्यात भाजपच ठेवायची नाही या विचाराने एकंदरीत व्यवस्था इथं निर्माण केली.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, प्रवीण तायडे हा नवखा कार्यकर्ता आहे आणि अतिशय जुने कार्यकर्ते ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. प्रचंड मेहनत घेतली त्या साधारण कार्यकर्त्याला भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात असतानासुद्धा निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही. ही भाजपची मोठी हार आहे. नवखी माणसं घ्यावी लागतात. अचलपूरनंतर बच्चू कडूने महाराष्ट्रात जे संघटन निर्माण केलं त्यानंतर दोन्ही मोठ्या पक्षांना बच्चू कडू नको आहे. असे बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com