BJP Batenge To Katenge: 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा, वाढला राजकीय पारा
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वादंग उठला आहे. योगी आदित्यंनी प्रचारादरम्यान बटेंगे तो कटेंगे असं एक वक्तव्य कोलं होत आणि जनतेला सावधानतेचा इशारा दिला होती. योगी आदित्यंनी केलेल्या या वक्तव्यावर सध्या राजकीयवर्तूळात अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी या नाऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी हा नारा योग्य असल्याचं सांगितल आहे. तर बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला योगीजींनी केलेल्या नाऱ्यात काहीच चुकीच नाही वाटल. या देशाचा इतिहास पाहा जेव्हा जेव्हा हा देश जातीवादांमध्ये वाटला गेला, प्रांतामध्ये वाटला गेला, गटांमध्ये वाटला गेला तेव्हा हा देश गुलाम झाला, ज्यामुळे देश पण मधून कापला गेला आणि माणसं देखील मधून कापली गेली. त्याच्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा या देशाचा इतिहास राहिला आहे आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे जर कोणी तरी असं म्हणतो आहे की वाटू नका आणि स्वतःला वाटून देऊ पण नका तर यावर टीका करण्यासारखी कोणती गोष्ट आहे. बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याचा अर्थ एकत्र राहणे आहे आणि मला यात कोणतीच गोष्ट चुकीची वाटत नाही.
अजित पवार म्हणाले की, बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याला आमच्या सगळ्यांकडून विरोध करण्यात आलेला आहे. मी एकट्यानेच नाही तर माझ्या पार्टीतील लोकांनी तर विरोध केला आहेच. पण भाजपच्या पंकजा मुंडेंनी देखील विरोध केला, एका राज्याचा मुख्यमंत्री येतो आणि तो बोलतो की बटेंगे तो कटेंगे त्यावेळी लगेच आम्ही त्यांना म्हटलं की हा उत्तरप्रदेश नाही आहे. तुमच्या उत्तरप्रदेशमध्ये असं चालत असेल, हा महाराष्ट्र आहे हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा महाराष्ट्र आहे.