बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपची कारवाई; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपची कारवाई; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपची कारवाई
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपकडून कारवाई

  • 40 नेत्यांचं भाजपमधून निलंबन

  • चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपकडून कारवाई करण्यात आली आहे. बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. बंडखोरी केलेल्या एकूण 40 नेत्यांचं भाजपमधून निलंबन केलं आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे पक्षाला आईसारखा समजतो. मग अशा शिस्तीचा कार्यकर्ता जेव्हा एखादं तिकीट मिळाले नाही किंवा आपल्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणून बंडखोरी करतो किंवा शिस्तीचं पालन करत नाही. त्यांना पक्षात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पक्षामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा पक्षाची शिस्त पाळावी लागते आणि त्यामुळे आम्ही आता 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. 6 वर्षाकरता दरवाजे बंद केलं आहेत आणि पुढच्या काळातही या प्रचारादरम्यान जे जे पदाधिकारी पक्षविरोधी कारवाया करतील. दुसरी यादीसुद्धा आम्ही प्रकाशित करु. पण आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षामध्ये पक्ष शिस्त मोडणे हे खपवून घेतलं जाणार नाही. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com