कोपरखैरणे विभागात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; खाजगी गाडीत सापडले प्रेशर कुकर
थोडक्यात
कोपरखैरणे विभागात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
खाजगी गाडीत सापडले प्रेशर कुकर
गाडीत अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा देखील बॅनर
विकास मिरगणे, नवी मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
यातच आता कोपरखैरणे विभागात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. ऐरोली मतदार संघातील कोपरखैरणे विभागात एका खाजगी गाडीत प्रेशर कुकर सापडल्याची घटना घडली आहे.
निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली असून शिवसेनेचं बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर असून आता हे प्रेशर कुकर नेमकं कोणी कोणासाठी पाठविले होते याचा तपास निवडणूक आयोग करणार आहे. यातच या खाजगी गाडीत विजय चौगुले यांचं बॅनर देखील आढळून आल्याची माहिती मिळत आहे.