Ravindra Dhangekar : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रवींद्र धंगेकर म्हणाले...

Ravindra Dhangekar : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रवींद्र धंगेकर म्हणाले...

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आज आपला विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, मला प्रचंड आनंद आहे. जेणेकरुन या भागामध्ये मला लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली. मला परत ही संधी जनता देईल असा माझा विश्वास आहे. गेली 30 वर्ष मी अनेक निवडणुका लढवल्या. 30 वर्षामध्ये मला नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळेच मी इथंपर्यंत पोहचलो आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, आप आणि शिवसेना या सर्व पक्षाचे मनापासून आभार मानतो. कारण यांनी मला ज्या पोटनिवडणुकीमध्ये मदत केली आणि मला विजयी केलं. आव्हान जनता ठरवते. हा मतदारसंघ हा जनतेचा आहे. हा मतदारसंघ हा कोणाचा बांधिल नाही आहे. जनतेचा बालेकिल्ला जनता त्यांचा हातात घेईल. असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com