बीड: मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज- निवडणूक निर्णय अधिकारी पाठक
बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली. आज मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज झालाय. जिल्ह्यातील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस यंत्रणेचा विशेष बंदोबस्त लावण्यात आलाय.
बीड जिल्ह्यात 68.88% मतदान झाले. बीड 62.18%, गेवराई 72.72%, माजलगाव 67.24%, आष्टी 73.5%, केज 63.48% तर परळी मतदारसंघात ७५.२७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान परळी विधानसभा मतदारसंघात झाले आहे. टपाली मतमोजणीसाठी प्रत्येकी एक टेबल, ईव्हीएम मशीनसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल असणार आहे. एका फेरीत 14 ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे.
गेवराईत 404 मतदान केंद्रासाठी 29 फेऱ्या, माजलगाव 393 मतदान केंद्रासाठी 28 फेऱ्या, बीड 396 मतदान केंद्र 29 फेऱ्या, आष्टी 440 मतदान केंद्र 32 फेऱ्या, केज 420 मतदान केंद्र 30 फेऱ्या तर परळीत 363 मतदान केंद्र 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. दुपारी दोननंतर बहुतांश ठिकाणच्या मतदार संघातील निकालाचे चित्र स्पष्ट होईल.