Bachhu Kadu Lost
Bachhu Kadu Lost

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव

अचलपूरमधून बच्चू कडू यांना पराभव पत्करावा लागत आहे. भाजपचे प्रविण तायडे हे विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे अनिरूद्ध देशमुख यांना 50071 मतांनी आघाडीवर आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव झाला आहे. बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला. अचलपूरमधून भाजपचे प्रविण तायडे 68685 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे. काँग्रेसचे अनिरूद्ध देशमुख यांना 50071 मतांनी आघाडीवर आहेत. तर १७ व्या फेरीमध्ये बच्चू कडू यांना एकूण 46144 मते मिळाली आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव निश्चित झाल्याचे पाहायला मिळत आहे.

निकालापूर्वी काय म्हटले होते बच्चू कडू?

“ही निवडणूक आम्ही सहज जिंकणार आहोत. राज्यात आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही. आम्ही लहान पक्ष आणि अपक्ष ठरवणार आहे कोणाला पाठिंबा द्यायचा. यासोबतच ते म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीचे 15 ते 20 आमदार विजयी होतील. आम्ही कोणाला पाठींबा देणार नाही तर आम्ही ठरवू कोणाचा पाठींबा घ्यायचा. आमचे सरकार स्थापन करण्यासाठी”, असे बच्चू कडू म्हणाले होते.

भाजपने लोकशाहीचा खून केला: बच्चू कडू

अचलपूर मतदार संघातून बच्चू कडू पराभवानंतर आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू 26 तारखेला चांदुर बाजार ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढणार आहेत. बच्चू कडू हे EVM हटाव मोहीम घेणार आहेत. भाजपाने EVM मॅनेज करून निवडणूक जिंकून जिंकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com