जुन्नरमधून अतुल बेनके यांची उमेदवारी निश्चित, 'या' दिवशी भरणार अर्ज

जुन्नरमधून अतुल बेनके यांची उमेदवारी निश्चित, 'या' दिवशी भरणार अर्ज

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली.

याच पार्श्वभूमीवर आता जुन्नरमधून अतुल बेनकेंची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. अतुल बेनके यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाला. बेनके यांची उमेदवारी फायनल झाली असून 24 ऑक्टोबरला अतुल बेनके आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com