विधानसभा निवडणूक 2024
Ashok Hinge: वंचितला मोठा धक्का! विधानसभेच्या तोंडावर अशोक हिंगे यांचा राजीनामा
विधानसभेच्या तोंडावर वंचितला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे कारण, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभेच्या तोंडावर वंचितला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे कारण, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याने अशोक हिंगे नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.
बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे यांनी निवडणूक देखील लढवली होती. मात्र कार्यकारणीच्या मागणीमुळे सामाजिक दृष्ट्या पक्षात काम करणे अडचणीचे ठरत असल्याचे अशोक हिंगे यांनी सांगितले, आणि मराठवाडा अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय अशातच वंचित बहुजन आघाडीने बीड जिल्ह्यात गेवराई, आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार देखील जाहीर केले आहे.