नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे, त्याआधी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. सज्जाद नोमानींच्या या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे. आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
थोडक्यात
नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका
शेलारांकडून 'एक है तो सेफ है'चा पुनरुच्चार
सज्जाद नोमानी यांच्याकडून व्होट जिहादची हाक दिल्याचा आरोप
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार गेलं तर दिल्लीतलं सरकारही जास्त दिवस टिकू शकत नाही
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या व्हिडिओवरून आक्रमक
नोमानींचं वक्तव्य ट्विट करत शेलारांनी निशाणा साधला.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांनी सडकून टीका केली आहे. शेलारांकडून 'एक है तो सेफ है'चा पुनरुच्चार करण्यात आला आहे. सज्जाद नोमानी यांच्याकडून व्होट जिहादची हाक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार गेलं तर दिल्लीतलं सरकारही जास्त दिवस टिकू शकत नाही. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या व्हिडिओवरून आक्रमक झाले आहेत. नोमानींचं वक्तव्य ट्विट करत शेलारांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, पुण्यात भर सभेत फडणवीसांनी मौलानांचा ऑडिओ ऐकवला आहे. मी तुम्हाला जागवण्यासाठी आलो असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. व्होट जिहाद होणार असेल तर हे धर्मयुद्ध असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. यांचे नापाक इरादे गाडून टाका असं आव्हान फडणवीसांनी दिलं आहे. "...तर एक है, तो सेफ है," नाऱ्याचा फडणवीसांनी पुनरुच्चार केला आहे.