anil deshmukh
anil deshmukhTeam Lokshahi

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया समोर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. देशमुख यांना उपचारानंतर आता डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हल्ला करणाऱ्याला सोडणार नसल्याचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागोमाग एक भूकंप पाहायला मिळत आहे. राज्यात मतदानाची प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र, विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सोमवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना रूग्णालयातून सोडल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

थोडक्यात

  • अनिल देशमुख यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला

  • देशमुख यांच्यावर रूग्णालयात सुरु होते उपचार

  • ‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही,'

  • डिस्चार्ज दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

काय म्हणाले अनिल देशमुख?

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही, आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला त्याला सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापलं असून, विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रतिआरोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

देशमुखांवर हल्ला

सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. अनिल देशमुख हे नरखेड येथील आपली शेवटची प्रचार सभा आटोपून काटोलच्या दिशेनं निघाले होते. यादरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीची समोरची काच फुटली तसेच ते देखील जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळताच त्यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्याला सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर सोमवारी वातावरण चांगलंच तापलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com