Amit Thackeray : माहीममधून उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर काल (22 तारखेला) मनसेची यादी जाहीर करण्यात आली. अमित ठाकरे यांना माहिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित ठाकरे म्हणाले की, लिस्टमध्ये नाव आल्यावर पोटात गोळा आला. पण मला कळलं आयुष्यात बदल होणार. जसं मी आधी वावरायचो तसं मी वावरु नाही शकत. जो फ्रिडम होता तो जाणार आहे. कारण शासकीय पदाचा ओझे एवढं असेल पण मी ते घ्यायला तयार आहे. मी इकडे लहानपणांपासून वाढलो आहे. मी नेहमी सांगतो राज साहेब एक भूमिका घेतात आणि ती उपकाराची भूमिका नसते. त्यांची कधी इच्छा नसते की समोरच्यानं परतफेड करावी. समोर कोणीही उभं राहूदे. शेवटी लढाई आहे. मी एकटा उभं राहून काय फायदा?
मला माहित आहे इकडच्या समस्या काय आहेत. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. लोकांचे प्रश्न मला तोंडपाठ आहेत. अनेकांचे वेगवेगळं प्रश्न आहेत. पण मला एक मनापासून करायचे आहे ते म्हणजे जो निसर्गाने आपल्याला दिलं आहे तो म्हणजे समुद्र किनारा. तो मला साफ करुन लोकांना अपेक्षा नसेल असा द्यायचा आहे. जो त्यांना कधी बघायलाच मिळाला नाही आहे. माहिमकरांच्या प्रश्नांसाठी मी एक वेगळा दिवस ठेवणार. माझे दरवाजे माहिमकरांसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी उघडे असतील.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 23नंतर आपण सत्तेत बसू. त्यानंतर बाकीचे पण प्रश्न सुटतील. पहिले तर मी आमदार झाल्यावर 3-4 दिवस माहिमकरांसाठी वेगळे ठेवणार. मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही जे जे चांगलं होईल त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत. मराठी लोक मुंबई सोडून नाही गेली पाहिजे. ही साहेबांची आणि माझी पण इच्छा आहे. 2019पासून जो चिखल झाला आहे ना. असं राजकारण मला लोकांपर्यंत नाही न्यायचे आहे. माझी राजकारणाची व्याख्या म्हणजे समाजकारण. सत्तेत येईपर्यंत तुम्हाला पाहिजे ते राजकारण करा, सत्तेत आल्यावर तुम्ही लोकांसाठी झटला पाहिजे. साहेबांनी पहिला महाराष्ट्र सैनिकांचा आवाज ऐकला, जनतेचा आवाज ऐकला. त्यांनी बघितलं अमितला राजकारणात आणायचं आहे, लोकांची काय इच्छा आहे. त्यानंतर मला त्यांनी आणलं. असं अमित ठाकरे म्हणाले.