Ajit Pawar Wins In Baramati
Ajit Pawar Wins In Baramati

Ajit Pawar: शरद पवारांना धक्का, बारामतीमधून अजित पवार विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. महायुती आघाडीवर असल्यामुळे राज्यात महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र, सध्याचे चित्र पाहता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळताना पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे. अजित पवार यांना 109848 मते मिळाली आहेत. तर युगेंद्र पवार यांना 49212 मते मिळाली आहे. १२ व्या फेरीतील ही आकडेवारी आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com