Sharad Pawar Candidate List: काका vs पुतण्या रिंगणात! शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर

Sharad Pawar Candidate List: काका vs पुतण्या रिंगणात! शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, 45 उमेदवारांची नावे समाविष्ट. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी.
Published by :
shweta walge
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 45 उमेवारांची नावे जाहीर करण्यात आलं आहे. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. बारामतीमध्ये पवारांनी भाकरी फिरवत अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदार संघातून बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. आता अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काल(बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली, त्यामध्ये अजित पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीच्या लढाईकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार सुपुत्र आहेत.

युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार आहेत.

शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय

शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली.

वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले

फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात

बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार

Sharad Pawar Candidate List: काका vs पुतण्या रिंगणात! शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पहिली यादी जाहीर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com