Ajit Pawar NCP: राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर, या दोन उमेदवारांना संधी
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी संपत जात असताना विविध पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी घाई केली आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आता चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीतून दोघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे अजित पवारांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५१ उमेदवारांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै २०२३ मध्ये बंडखोरी झाली होती. अजित पवारांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्यासोबत घेऊन भारतील जनता पक्षाला समर्थन दिलं आहे. त्यामुळे विरोधी बाकावरून ते थेट उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादींना हवीतशी जादू करून दाखवता आली नाही.
त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर सोडण्यात आलं. त्यामुळे विधानसभेत अजित पवार एकला चलो रे ची भूमिका घेतील असं म्हटलं जात होतं. परंतु, आम्ही महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर महायुतीत त्यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.