Ajit Pawar: ठरलं तर! अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार

Ajit Pawar: ठरलं तर! अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार

विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून आता पहिली यादी जाहीर केली जात आहे अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी नुकतीच समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून आता पहिली यादी जाहीर केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोण निवडणुक लढवणार अशी चर्चा सुरु होती यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार हे बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून अजित पवार आता बारामतीमधून लढणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी

बारामती- अजित पवार

येवला- छगन भुजबळ

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवाळ

अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम

श्रीवर्धन- आदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश दादा सोळंके

वाई- मकरंद पाटील

अंमळनेर- अनिल भाईदास पाटील

सिन्नर- माणिकराव कोकाटे

खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले - किरण लहामटे

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

शहापूर- दौलत दरोडा

पिंपरी- अण्णा बनसोडे

कळवण- नितीन पवार

वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

मावळ- सुनील शेळके

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज आहिरे

चंदगड - राजेश पाटील

इगतुरी- हिरामण खोसकर

तुमसर- राजे कारमोरे

पुसद -इंद्रनील नाईक

अमरावती शहर- सुलभा खोडके

नवापूर- भरत गावित

पाथरी- निर्णला विटेकर

मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com