ajit pawar exclusive
ajit pawar exclusive

Ajit Pawar Exclusive : बारामतीकरांनी आग्रह केल्यानंतर विधानसभेच्या रिंगणात- अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची लोकशाही मराठी न्यूजने मुलाखत घेतली. लोकसभेत काम करूनही निकाल अनपेक्षित लागल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये जनतेचा नेमका कौल कुणाकडे आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची लोकशाही मराठी न्यूजने मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवार यांनी अनेक खुलासे केले आहेत. लोकसभेत काम करूनही निकाल अनपेक्षित लागल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

महायुती 175 पेक्षा जागा जिंकणार, महायुतीचे सरकार स्थापन होणार

महायुतीला पावशे दोनशे पेक्षा जास्त जागा मिळतील आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करणार असल्याचा अजित पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपण बाहेर पडलो नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच त्यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्हा आपल्याकडेच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बटेंगे तो कटेंगे भुमिकेला विरोध हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो

बटेंगे तो कटेंगे ही भूमिका सेक्युलर महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न पटणारी आहे. म्हणून या भूमिकेला विरोध असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

मुंबईतील पंतप्रधान मोदी यांच्या सभेत अनुपस्थित असण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांना मुंबईतील सभेत येणार नसल्याचे कळवलं होतं. महायुतीच्या प्रत्येक सभेत प्रमुख नेते असणं गरजेचं नाही, तर घटक पक्षातील प्रतिनिधी ही उपस्थित असल्याची उदाहरण त्यांनी यावेळी दिली.

नवाब मलिक यांनी उमेदवारी देण्याबाबत विचारलं असता, प्रत्येक पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. मतमतांतरे असू शकतात असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका आहे. आपली भूमिका सेक्युलर होती आणि यापुढे ही राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

विधानसभेत कोणतं आव्हान?

महाविकास आघाडी विरोधातच निवडणूक लढत आहोत. तसेच या निवडणुकीत कोणावरही आरोप न करता. पक्षाने केलेल्या कामाला प्रचार आणि पुढील ५ वर्षातील व्हिजनवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com