ajit pawar
ajit pawar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' पदाधिकाऱ्यावर अजित पवार यांची मोठी कारवाई

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • कोथरुडमध्ये बंडखोरी केल्यानं पक्षाची कारवाई

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विजय डाकले यांची हकालपट्टी

  • चंद्रकांत पाटलांविरोधात विजय डाकले अपक्ष लढणार

अमोल धर्माधिकारी, पुणे

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अनेक पक्षात बंडखोरी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोथरूड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विजय डाकले यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कोथरुड मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढवित आहेत. मात्र डाकले यांनी बंडखोरी केली असल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले आहे .महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात डाकले निवडणूक लढवित असून ही कृती पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com