Aditya Thackeray Dhruv Rathee: आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलं; नेमकं प्रकरण काय ?

Aditya Thackeray Dhruv Rathee: आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलं; नेमकं प्रकरण काय ?

आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं मिशन स्वराज्य आव्हान स्वीकारलं आहे. आदित्य ठाकरेंनी ट्वीट करतं ही माहिती दिली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं मिशन स्वराज्य आव्हान स्वीकारलं आहे. आदित्य ठाकरेंनी ट्वीट करतं ही माहिती दिली आहे. आव्हान स्वीकारणे ते केवल स्वीकारण्यासारखे आहे म्हणून नव्हे तर तर आपण नेमक काय करु इच्छितो आणि आपल्या राज्याला काय हवे आहे म्हणून स्वीकारले गेले आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले, तर पुढे ते ट्वीटद्वारे म्हणाले की,

मिशन स्वराज्य:

मविआ म्हणून नेमक्या ह्याच उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो, जो आत्ताच्या सत्ताधार्‍यांनी कपटाने थांबवला.

हे आव्हान आम्ही स्वीकारतोच आहोत, कारण ते फक्त स्वीकारण्याजोग आव्हान आहे म्हणून नाही तर आम्हाला हीच चर्चा हवी होती म्हणून, कारण जे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, गरजेचं आहे, त्यावर चर्चा व्हायलाच हवी! चला, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनो, हे पण करून दाखवूया! आव्हान स्विकारलं!

1.शेतकऱ्यांना मदत - प्रशिक्षण, माती चाचणी, बियाणे बँक, स्थानिक बाजारपेठा

2.पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग)

3.मोफत उत्तम शिक्षण. मोफत उत्तम आरोग्यसेवा

4.शुद्ध हवा आणि पाणी

5.सर्व नागरिकांची सुरक्षितता

6.स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) विकास

7.सर्वांसाठी रोजगार

तर याचसोबत रोहित पवार यांनी देखील ट्वीट करतं म्हटलं आहे की, प्रिय ध्रुव राठी,

महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच शाश्वत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आमच्या सर्व योजना तयार असून याच मुद्द्यांना घेऊन लोकांमध्ये जात आहोत आणि राज्यभरातून लोकांचा आम्हाला प्रचंड पाठींबा मिळत आहे.

राहिला प्रश्न निधीचा तर सद्यस्थितीला महाराष्ट्राची तिजोरी खाली असली तरी तिजोरी खाली होण्याचे कारण आहे ते म्हणजे दलाली. महाराष्ट्राच्या सात लाख कोटीचा बजेटमधून मोठी रक्कम दलालीत जाते, यापैकी ५० हजार कोटींची प्रकरणे आम्ही पुराव्यासकट बाहेर काढली आहेत. या दलालीच्या दलदलीतून महाराष्ट्राला बाहेर काढून निधीची अडचण आम्ही दूर करू.

.... आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून लवकरच म्हणजेच २३ तारखेनंतर महाराष्ट्र स्वराज्याकडे मार्गस्थ होईल यात शंका नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com