भाजपवाले बटेंगे कटेंगे लुटेंगे मारेंगे याच्यापुढे जातच नाहीत- आदित्य ठाकरे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज सगळ्या राजकीय पक्षांकडून सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी देवगड व माणगाव या दोन सभा गाजवल्या आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवाले बटेंगे कटेंगे लुटेंगे मारेंगे याच्यापुढे जातच नाहीत अस म्हणत हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
गद्धार डरपोक होते पण अखेर निवडणूक लागली आता राज्यात परिवर्तन कधी करायच आहे, त्याची आपण वाट बघत आहोत. आमचे हिंदुत्व सांगत हृदयात राम आणि हाताला काम तुमच्या आणि आमचे हिंदुत्व यामध्ये मोठा फरक आहे, म्हणजे कोणत्या मंदिरात जाता कोणत्या रंग घालता इतकं पोकळ आमचं हिंदुत्व नाही. हिंदू धर्म खूप मोठा आहे. रघुकुल रीत चली आहे प्राण जाये पर वचन न जाये हे आमचं हिंदुत्व आहे असे शब्दा आदित्य ठाकरे यांनी भाजपाचा व महायुतीचा समाचार घेतला आहे. मोदी साहेब तुमच्या सरकारने आणलेला राज्यात एक तरी उद्योग दाखवा तुम्हाला चॅलेंज करतो.
अनेक उद्योग बाहेर नेले तरुण तरुणीना बेरोजगार केल, रोजगारी निर्मिती का करू शकला नाहीत? असा सवाल करत हा महाराष्ट्र तुम्ही अंधारत नेलात म्हणून आम्हाला मशाल पेटवायची आहे. गुजरातमधून लोक आली आहेत, प्रचारासाठी असाही टोला त्यांनी लगावला आहे. भाजपवाले बटेंगे कटेंगे लुटेंगे मारेंगे याच्यापुढे जातच नाहीत असाही हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडीचे सरकार येणार तेव्हा आपण चांगली काम करू असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथील सभेत ते बोलत होते कणकवलीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासाठी ही सभा घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरी सभा कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्यासाठी माणगाव येथे घेण्यात आली.