महाराष्ट्राचा महानिकाल
sangamner Vidhansabha: संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पराभूत; कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का
संगमनेरमध्ये कॉंग्रेसेचे नेते बाळासाहेब थोरात पराभूत झालेले आहेत. कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का याठिकाणी बसलेला आहे.
विधानसभेचं बगुल सर्वत्र पाहायला मिळत आहे. 20 तारखेला राज्यात मतदान पार पडलं आणि आज म्हणजेच 23 तारखेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आहे. आज सर्व पक्षातील नेते काही ठिकाणीवर आघाडी तर पिछाडीवर येताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान संगमनेरमध्ये कॉंग्रेसेचे नेते बाळासाहेब थोरात पराभूत झालेले आहेत. कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का याठिकाणी बसलेला आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मविआचे तीन पक्ष सध्या मोठ्या संख्येने पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर गेले होते. अमोल खताळ पहिल्यापासूनच आघाडीवर राहिले.अखेर अमोल खताळ विजयी झाले आहेत.बाळासाहेब थोरात यांना 90,947 इतके मत होती तर अमोल खताळ यांना 1,04,784 इतके मत आहेत आणि अमोल खताळ यांनी 13 हजार 837 मतांना बाळासाहेब थोरात यांचा पराभूत केला आहे.