Jamner Vidhansabha: भाजपच्या गिरीश महाजन यांचा जळगावच्या जामनेरमधून विजय
विधानसभेचं बगुल सर्वत्र पाहायला मिळत आहे. 20 तारखेला राज्यात मतदान पार पडलं आणि आज म्हणजेच 23 तारखेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आहे. आज सर्व पक्षातील नेते काही ठिकाणीवर आघाडी तर पिछाडीवर येताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान महाडमधून भरत गोगावले विजयी झाले आहेत. तर त्यांचा हा चौथा विजय आहे. चौकार मारत त्यांनी विधानसभा निवडणूकीत विजय मिळवला आहे.
याचपार्श्वभूमीवर भरत गोगावले म्हणाले की, चांगल्याप्रकारे बघतो आहे जी आम्ही घेतलेली मेहनत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्यांनी तसेच मतदार बांधवांनी दाखवलेला विश्वास हा खुप महत्त्वाचा ठरलेला आहे. मी खूपवेळा म्हणालो आहे मी कितीवेळा पण आमदार झालो खासदार झालो तरी आमचे पाय हे जमिनीवरचं असणार आहेत. मला पुर्ण खात्री होती आपला विजय होणार आहे
तर जामनेरमधून गिरीश महाजन यांचा देखील विजय झालेला आहे. तिसरा निकाल समोर आला आहे. गिरीश महाजन हे आता विजयी झाले आहेत. सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीमधून तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. याआधी कालिदास कोळंबाकर हे वडाळ्यामधून विजयी झाले होते. त्यानंतर श्रीवर्धनमधून आदिती तटकरे या विजयी झाल्या होत्या आणि आता महायुतीतले भाजपचे गिरीश महाजन हे देखील विजयी झाले आहेत. तर महायुती सध्या 214 जागांनी आघाडीवर आहे तर मविआ ही 54 जागांनी आघाडीवर आहे.