Viral Video : चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्ध महिलेचा गेला तोल, आरपीएफ कर्मचाऱ्यांनी असे वाचवले प्राण
Viral Video : रेल्वे स्थानकावर अनेकदा लहानसहान घटना घडतात. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे अनेक वेळा या घटनांमध्ये लोकांचे प्राण वाचले आहेत. यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही आरपीएफच्या या धाडसी महिला अधिकाऱ्याचे कौतुक कराल. (woman slipped while boarding a moving train then rpf staff saved he life railway ministry shared video)
रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला आणि तिचा मुलगा चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान महिला आणि मुलगा दोघेही घसरले. तेव्हा एका आरपीएफ महिला अधिकाऱ्याने ट्रेनचा वेग कमी करून दोघांचे प्राण वाचवले.
रेल्वे मंत्रालयाने अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर केला आहे
रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना मंत्रालयाने कॅप्शन दिले आहे, पश्चिम बंगालमधील बांकुरा स्थानकावर RPF कर्मचार्यांची दक्षता आणि तत्पर कारवाईमुळे चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरलेल्या वृद्ध महिलेचा आणि तिच्या मुलाचा जीव वाचला. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढू नये किंवा उतरू नये."