शिंदे सरकारला दणका बसणार? 16 आमदार अपात्र होणार? सुप्रीम कोर्ट म्हणाले...

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही 10 ऑक्टोबरला होणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही 10 ऑक्टोबरला होणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पण अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 3 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या कम्प्युटर जनरेडेट तारखा असल्यामुळे यामध्ये बदल होण्याची देखील शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवार (18 सप्टेंबर) रोजी अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्याच मुद्द्यांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याच्या आतच कारवाई सुरु करण्याचे निर्देश दिले. तर पुढील दोन आठवड्यांच्या आत अध्यक्ष कशाप्रकारे हे संपूर्ण प्रकरण हाताळतील यासंदर्भातील तपशील न्यायालयाला द्यावी, असे देखील कोर्टाने निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने तारीख जाहीर केलीये. याप्रकरणावर पुढील सुनावणी ही 3 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com