Pune Loksabha : पुणे लोकसभा पोटनिवडणूक का घेतली नाही? हायकोर्टाचा सवाल

पुण्यातील खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतरही लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतलं आहे.
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतरही लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतलं आहे. बापट यांच्या निधनानंतरही सहा महिन्यांत निवडणूक का घेतली नाही, असा सवाल करत न्यायालयाने याप्रकरणी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. इतकेच नव्हे तर पोट निवडणूक का घेतली नाही, याची समाधानकारक माहिती सोमवारपर्यंत दिली नाही तर आम्ही 11 डिसेंबर रोजी योग्य ते आदेश देऊ, असे आयोगाला बजावले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com