Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या सुनावणीत आज होणार काय?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस सुनावणी चालेल.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस सुनावणी चालेल. सकाळी 8:30 वाजता ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडतील. अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटाला दीड दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवार, बुधवारचा दीड दिवस शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करतील. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी बाजू मांडणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com