Vidhansabha Election Poll | सत्ताधारी-विरोधक धाकधूक वाढली ; पश्चिम महाराष्ट्रात कोणाची सरशी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर; पश्चिम महाराष्ट्रात कोणाची सरशी होणार? जाणून घ्या सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील थेट लढतीचे अपडेट.
Published by :
shweta walge

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाची सत्ता स्थापन होईल, कोण मुख्यमंत्री होईल, आणि कोणाला किती जागा मिळतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये कोणाची सत्ता येणार आहे, कोणाचा पराभव होणार आहे, या सर्व प्रश्नांची चर्चा सुरू आहे.

लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी राज्याच्या २८८ मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य मतदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय लढाईकडे लक्ष वेधले जात आहे.

तर, जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येण्याची शक्यता आहे, आणि कोणाचा पराभव होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींची अपडेट्स मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत.

महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजप 149, शिवसेना शिंदे गट 81 तर अजित पवार गट 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीमध्ये मध्ये काँग्रेसने 101 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 95 जागांवर आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 86 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्राच्या लढाईत बहुजन समाज पक्ष आणि एआयएमआयएमसह छोटे पक्षही आहेत. बसपने 237 तर AIMIM ने 17 उमेदवार उभे केले आहेत. 288 जागांसाठी 4,136 उमेदवार रिंगणात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com