Eknath shinde On ST Bus Strike | आपण संप करू नये; योग्य तो निर्णय घेऊ; मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन

राज्यभरातील लाल परीची चाकं थांबली आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

राज्यभरातील लाल परीची चाकं थांबली आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. विविध मागण्यांकरता एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संयूक्त समितीकडून बंद पुकारण्यात आलेला आहे. एसटी बंद झाल्यानं ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झालेली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्याने चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.

उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे, यापूर्वी देखील बैठक झालेली आहे. एसटी म्हणजे ही गावोगावी जाणारी एसटी आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलावली आहे, बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल. परंतू एसटीचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत त्यांनी आता गणपती येत आहेत त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी करण्यासाठी बाजारपेठा तिथे जाणं असतं त्यामुळे माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की आपण संप करु नये. आपण सकारात्मक चर्चेतून मोठे-मोठे प्रश्न सोडवले आहेत त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com