Wagh Nakh: लंडनमधून येणाऱ्या वाघनखांबात इतिहासकारांना शंका,शेलार आणि शंभुराज देसाई काय म्हणाले पाहा?

लंडनमधून येणाऱ्या वाघनखान संदर्भात इतिहासकारांना शंका आहे. लंडनमधून येणारी वाघनख शिवरायांची नाहीत असं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचा मोठा दावा आहे.
Published by :
Team Lokshahi

लंडनमधून येणाऱ्या वाघनखान संदर्भात इतिहासकारांना शंका आहे. लंडनमधून येणारी वाघनख शिवरायांची नाहीत असं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचा मोठा दावा आहे. खरी वाघनख साताऱ्यातून बाहेर गेली नसल्याचा दावा ते करत आहेत. सरकार वाघनखांबाबत खोटी माहिती देत असल्याचा आरोप त्यांनी केली आहे. वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करु नका असा सल्ला इंद्रजीत सावंत देत आहेत. राजकीय नेत्यांकडून महाराष्ट्राची फसवणूक केली जात असल्याचा आरोप इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

यापार्श्वभुमीवर शंभूराज देसाई प्रतिक्रिया देत म्हणाले, कोणत्या संदर्भाच्या आधारे त्यांनी दावा केला आहे मला नाही. पण आपल्याला सगळ्यांना हा इतिहास माहित आहे, की भवानी तलवार आणि छत्रपति शिवाजी महाराजांची वाघनख लंडनच्या म्युझीयममध्ये आहेत. हा खूप जुना इतिहास आहे. याच्यासाठी पूर्वीचे संदर्भ देखील आहेत.

त्यामुळे जेव्हा राज्य सरकारने ती वाघनख आणि ती तलवार आणायचा निर्णय घेतला, तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतली आहे. तरी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच काही वेगळ मत असेल तर संस्कृती कार्य विभागाचे मंत्री त्यांच्यासोबत बोलतील आणि इंद्रजीत सावंत यांची शंका दूर केली जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com