Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार
2021-22 लेखापरीक्षण अहवालात प्राचीन मौल्यवान 315 दागिन्याची नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड आलेला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरास राजे महाराजे पेशवे संस्थानिकांनी प्राचीन मौल्यवान दागिने भेट दिले आहेत. सन 2021-22 चे लेखापरीक्षण मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे यात अनेक वस्तूंच्या नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. सभा मंडप समोरील दरवाजे, गरुड खांब, विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा, चोळखांबी येथील चौकट व दरवाजा, खजिना आतील दरवाजा, विठ्ठल मुख्य गाभारा, विठ्ठलाचे 203 व रुक्मिणी मातेच्या 111 दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नाही. यामुळे संशय व्यक्त आहे, याबाबत मंदिर समितीने उत्तर अहवाल अगोदर जोडले आहेत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मंदिर समितीचा लेखापरीक्षक अहवाल सादर करण्यात आला. मात्र यामधील निष्कृष्ट दर्जाच्या लाडूविषयी चर्चा करण्यात आली मात्र विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अंगावरील दागिने व इतर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे.