Vitthal Rukmini Mandir : Pandharpur : नववर्षानिमित्त सजला विठुरायाचा गाभारा

नववर्षाच्या स्वागताला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी विविध प्रकारच्या पानांची, फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

नववर्षाच्या स्वागताला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी विविध प्रकारच्या पानांची, फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सेवा देवाच्या चरणी अर्पण केली आहे. नवीन वर्षाची सुरवात विठुरायाच्या दर्शनाने करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने ही सजावट केली आहे. या सजावटीमुळे विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे. रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावत विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या नाम-गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com