Vijay Wadettiwar | मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहावं, वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीकास्त्र टाकलं आहे. मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहावं, वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल.
Published by :
Team Lokshahi

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीकास्त्र टाकलं आहे. मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहावं, वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल. मुख्यमंत्री नाटकामध्ये फिरता रंगमंच ठेवा असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. महायुतीची सत्ता येऊच शकत नाही असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत. दिल्लीतून कितीही फौज आणली तरी त्यांची सत्ता येणार नाही तर महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला नाकारल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.

तर यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला वाटतं कोणत्या तरी एका लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगाव आणि त्या नाटकाचं नावचं मुख्यमंत्री ठेवावं तसेच त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे. तसेच पुढे ते म्हणाले, सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com