Vidhanparishad Seats : १२ जागांसाठी खलबतं | 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग

विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून या जागांची नियुक्ती रखडलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून या जागांची नियुक्ती रखडलेली आहे. मविआच्या काळापासून या 12 जागांचा निर्णय झालेला नाही आहे. मविआकडून जी लिस्ट देण्यात आलेली होती.

त्याच्यावर तेव्हाच्या राज्यपालांनी निर्णय घेतला नव्हता आणि त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि न्यायालयामध्ये असतानाच आता त्याच्या नियुक्तीवर स्थगिती नाही आहे. त्यामुळे महायुती सरकारकडून या 12 जागा भरण्यासाठी हालचाली सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये रात्री वर्षा बंगल्यावर चर्चा झाल्याचं देखील समोर आलं आहे.

राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये भाजपाला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 3 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या 12 जागा राज्यपाल नियुक्त भरल्या जाणार आहेत आणि त्याची लिस्ट महायुतीमधील या तिन्ही पक्षांना द्यावी लागणार आहे. त्यानंतर राज्यपाल त्या 12 आमदारांची नियुक्ती विधानपरिषदेवर करतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com