Vidhan Sabha Election: विधानसभेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचा मेळावा

जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विधानसभेच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. करवीर विधानसभेची नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published by :
Team Lokshahi

जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विधानसभेच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. तर करवीर विधानसभेची नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जात आहे. विधानसभेच्यानिमित्ताने जनसुराज्य शक्ती पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला असून जनसुराज्य शक्ती पक्षाचे करवीर मतदार संघाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्याकडून लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आलेल आहे.

या सोहळ्याला करवीर तालुक्यातील 2 हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आशा सेविका आणि बचत गट सीआरपी यांचा समावेश होता. तर महिला सुरक्षेला प्राधान्य देत अंगणवाडी सेविका मदतनीसांसह आशा सेविकांचा केला सन्मान देखील करण्यात आलेला आहे. महिलांच्या सुरक्षेतेसाठी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट कडून महिला पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून संकटात असणाऱ्या महिलांना काही मिनिटात मदत मिळण्यासाठी हे पथक काम करेल,असं संताजी घोरपडे यांनी सांगितल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com