Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वरुण सरदेसाई म्हणाले की, उद्या सिनेटच्या निवडणूकीचं मतदान होणार आहे आणि कालरात्री विद्यापीठाने एक परिपत्र काढलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिनेटच्या निवडणूकीला स्थगिती देण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi

वरुण सरदेसाई म्हणाले की, उद्या सिनेटच्या निवडणूकीचं मतदान होणार आहे आणि कालरात्री विद्यापीठाने एक परिपत्र काढलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिनेटच्या निवडणूकीला स्थगिती देण्यात येणार आहे. केवळ आणि केवळ युवासेना पुन्हा एकदा पैकी जागा जिंकणार या भितीपोटी या निवडणूकीला एकदा नाही तर दुसऱ्यांदा स्थगिती देण्यात येत आहे. खरं तर ही निवढणूक 10 सप्टेंबर 2023 रोजी होणार होती. त्यावेळी तब्बल 92 हजार पदवीदरांची नोंद या निवडणूकीत झाली होती.

त्यावेळेस देखील सरकारला हिच भीती होती की, जर निवडणूक झाली तर 10 पैकी 10 जागा या युवासेनेला जातील आणि आपण तोंडावर पडू म्हणून त्यांनी ती निवडणुक स्थगित केली. त्यानंतर संपूर्ण मतदान यादी ही खाली करण्यात आली परत एकदा शुन्यापासून मतदार नोंदणी झाली, परत एकदा निवडणूकीचं परिपत्र काढलं आणि जेव्हा शिंदे सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षाला हे समजलं की, आदित्य ठाकरे पुन्हा एकदा 10 पैकी 10 जागा जिंकणार आहेत त्यावेळी त्यांनी पुन्हा ही निवडणूक स्थगित केली.

तसेच मुंबई विद्यापीठाचा राजाभाई टॉवर मंत्रालयासमोर झुकताना पाहिला आहे. त्यामुळे विद्यापिठं विद्यापिठाचं प्रशासन चालवतं आहे की, मंत्रालय चालवत आहे असा देखील प्रश्न आता आम्हाला पडत आहे. खरं तर विद्यापिठाची निवडणूक ही विद्यापिठाने घेतली पाहिजे. त्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करण्याचा काही प्रश्नचं नाही पण केवळ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या युवासेनेला यश मिळू नये जर यश मिळाले तर विधानसभेमध्ये त्याचा परिणाम होईल तसेच मुंबईची पदवीधरांची निवडणूक ही तोंडावर आली आहे. शिक्षक निवडणूक तोंडावर पडली आहे तर सिनेटच्या निवडणूका देखील तोंडावर पडले तर उच्च शिक्षित उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाच्या मागे आहेत हे समोर येईल म्हणून या भीतीमुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com