व्हिडिओ
UPSCचे अध्यक्ष मनोजकुमार सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला राजीनामा
UPSCचे अध्यक्ष मनोजकुमार सोनी यांनी राजीनामा दिला आहे.
UPSCचे अध्यक्ष मनोजकुमार सोनी यांनी राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्याआधीच मनोजकुमार सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
16 मे 2023 रोजी त्यांना यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससीचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मनोजकुमार सोनी यांनी दिलेला राजीनामा अद्याप स्वीकारलेला नसल्याची माहिती मिळत आहे.
2029मध्ये मनोजकुमार सोनी यांचा कार्यकाळ संपणार होता मात्र कार्यकाळ संपायच्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.